बलगाव | पत्रकार संघटना व उमदी पोलीसांतर्फे गरिबांना अन्नधान्याचे वाटप

 

 


 

बालगाव,वार्ताहर : कोरोना विषाणुमुळे देशासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून यामुळे शासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक उद्योग धंदे, कारखाने, छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग, शेतमजूरी, बंद झाल्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूरदार, कामगार, बेकार झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उमदी व सुसलाद ता. जत येथील पारधी तांडा , मागुतकरी, व उमदी व परिसरातील गरिब कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जीवनावश्यक वस्तु आणि अन्नधान्य यामुध्ये प्रत्येकी कुटुंबास गहु,ज्वारी,तांदूळ,तेल,साबण,साखर,चहापुडी देवून दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न  जत तालुका मराठी पत्रकार परिषद आणि उमदी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आला. या उपक्रमाचे उमदी परिसरातून कौतुक होत आहे.कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे हातावर पोट असणारे अनेक  शेतमजूर आणि कामगार बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी शासनाच्यावतीने सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याचे आवाहन केले जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत  जत तालुका मराठी पत्रकार परिषद आणि उमदी पोलीस ठाणे यांच्या विध्यमाने उमदी येथील पारधी तांडा , मागुतकरी, गरजू गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट आणि अन्नधान्य वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ यांनी जत तालुक्यातील सर्व जनतेला त्यांनी आवाहन केले की विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करून आपण घरातच राहावे आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी व या राष्ट्रीय आपत्तीत सर्वांनी मिळून मुकाबला करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.यावेळी सहाय्यक पोलिस पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे , जेष्ठ पत्रकार मलकारी वायचळ, पोलिस श्रीशैल वळसंग, संभाजी कारडे, आप्पा कुभार, नितीन पलुसकर, विक्रम गोदे, रामु बन्नेनवर, विनिता सकट, नकुशा सावंत,  पत्रकार महादेव काबंळे, गोरख भोसले, दत्ता बिरुणगी, यलापा कावडे, सतीश आजमाने, संजय ऐहोळ्ळी आदी  उपस्थित होते.

 

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्याहस्ते गरजूगरीब कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप करताना सोबत सर्व पत्रकार सह पोलिस कर्मचारी)
 

 


 


 
 

Attachments area