जत | शिवाजी चौक ते संभाजी चौकापर्यतच्या गटारी तुंबल्या | शहरातील परिस्थिती

 

जत शहरातील परिस्थिती

जत,प्रतिनिधी : जत शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा ते छत्रपती संभाजी चौकापर्यतच्या मुख्य रस्त्याकडेची गटारी तुंबल्याने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.तातडीने गटारी स्वच्छ कराव्यात अशा मागणीचे निवेदन या परिसरातील नागरिकांनी दिले आहेत.
जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जत -सांगली छत्रपती शिवाजी पुतळा ते छत्रपती संभाजी चौकापर्यतच्या मुख्य रस्त्यावर कडेची गटार अरूंद झाली आहे.त्याचबरोबर गटारीवर काही दुकानदार व रहिवाशांनी बांधकामे केल्याने गटारीतील पाण्याच प्रवाह अडून दुर्गंधी परसरली आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता केली जात असताना या भागात नगरपरिषदेचे दुर्लक्ष का असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

 

 


जत शहरातील शिवाजी चौक ते संभाजी चौकापर्यतच्या गटारी तुंबल्याने असे पाणी थांबले आहे.