'कोरोना'विरोधातील लढ्यात आ.सांवत मैदानात | रुग्णालये,प्रा.आ.केंद्रे,ग्रामपंचायतीना भेटी,सतर्क रहाण्याच्या सुचना,साहित्य वाटप
 

उमदी,वार्ताहर : 'कोरोना'विरोधातील लढ्यात आमदार विक्रमसिंह सांवत मैदानात उतरले आहेत.कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्यापासून आ.सांवत प्रशासन, आरोग्य विभागासह स्व:ता जनतेच्या संरक्षणासाठी सक्रीय आहेत.सातत्याने ते आरोग्य केंद्र,रूग्णालये,ग्रामपंचायती व तालिकास्तरीय प्रशासनाबरोबर सतर्क राहत कोरोना विषाणू फैलाव रोकण्यासाठी सक्रीय आहेत.रविवारी (ता.1) उमदी,संख,कोतेंबोबलाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व उमदी पोलिस ठाणे याठिकाणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेटी दिल्या.सर्व उपाय योजनाची पाहणी केली.तसेच प्रत्येक विभागास मास्क व सँनीटाइजर दिले.कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या.यावेळी सोबत गटविकास अधिकारी  अरविंद धरणगुटीकर व तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, उपस्थित होते.

यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत  यांनी पोलीस ठाणे येथे येऊन या विभागातील कामाचा आढावा घेत शेतकरी बांधव आपला माल ने आण करताना पोलीस कर्मचारी यांनी थोडी मुबा द्यावी. तसेच शेतकरी वर्गानी माल वाहतुक गाडीतूनच प्रवास करावा व अन्य वाहनांची रस्त्यावर वर्दळ केल्यास कारवाई करा. असे उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांना सांगत नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे,असे आव्हान ही आमदार सावंत यांनी जनतेला केले. तसेच किराणा माल ज्यादा दराने विक्री होत असेल तर त्याकरिता पुरवठा विभागाकडून दर पत्रक मागवून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल. जर कोणी जादा दराने विक्री करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या.पोलीस, पत्रकार व आरोग्य विभागतील सर्व कर्मचारी जनतेची हितासाठी झटत असताना स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान आमदार विक्रम सावंत यांच्याकडून उमदी जिल्हा परिषद गटातील सर्व पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी,आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,सर्व दैनिकाचे पत्रकार,आशा वर्कर्स यांना प्रत्येक दोन मास्क व एक सेनिटाइजर देण्यात आले. सर्व कर्मचारी वर्गाकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.

 

 

उमदी ता.जत येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करताना आ.विक्रमसिंह सांवत


 

 
 

Attachments area