Header Ads

मानवाधिकार संघटनेने जपली मानवता | तहसिलदार सचिन पाटील
जत,(प्रतिनिधी):जत शहरातील मानवाधिकार संघटना व सम्राट अशोक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वाटप शेगाव रोडलगत जडी-बूटी औषध विकणाऱ्या गरजूंना देण्यात आले. हे किट वाटप तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानवाधिकार संघटनेचे रज्जाक नगारजी, सम्राट अशोक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थापक अतुल कांबळे, बांधकाम कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक समितीचे सदस्य सलीम गवंडी, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राजस्थान राज्यातील जडी-बुटी या आयुर्वेदिक औषधे विकणारे पंधरा कुटुंबापुढे रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही अवस्था रज्जाक नगारजी, अतुल कांबळे ,सलीम गवंडी यांच्या नजरेस पडली. त्यांनी समारे पंधरा दिवस परेल इतके अन्नधान्य दिले. यावेळी तहसीलदार सचिन पाटील म्हणाले की,रज्जाक नगारजी, अतुल कांबळे. सलीम गवंडी यांनी सध्याच्या रोगराईच्या महामारीत केलेले सामाजिक कार्य व दिलेले योगदान कौतुकास्पद व आदर्शवत असे आहे. शहरातील इतर सामाजिक संस्थानी व दानशूर व्यक्तींनी या सामाजिक कार्याला योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी अतुल कांबळे, सलीम गवंडी म्हणाले की, सध्या देशावर व राज्यावर कोरोना या आजारामुळे २१ दिवसाचे लॉकडाऊन झालेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. या कालावधीत गरीब व गरज लोकांच्या गरजा पूर्ण करणे हे माणुसकी म्हणून प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य
आहे. या कुटुंबाना आमच्याकडून अन्नधान्याचे किट दिलेले आहे. अशी अनेक कुटूंबीय असतील तर त्यांना इतर दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन कांबळे व गवंडी यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.