जत | जतेत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 जत,(प्रतिनिधी):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  आठवले गटाचे वतीने आज गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी पुढाकार घेतला.लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.लोकांना संचारबंदीमुळे घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे  रोजगार नाही त्या मुळे त्यांच्या हाताला काम नाही. लाॅकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सामाजिक हीत लक्षात घेऊन आज शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, शिवाजीपेठ येथिल जाते घडाई परप्रांतीय मजूर, उमराणी रोड परिसरातील गोल्हार वस्तीतील कुटुंबे व छत्रीबाग परिसरातील काटवट तयार करणारे मातंग बांधव या सर्वांना शंभरावर जिवनापयोगी वस्तू असलेल्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु. संजयरावजी कांबळे यांनी दिली.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे तालुकाध्यक्ष आयु.संजय कांबळे (पाटील),सरचिटणीस आयु. प्रशांत ऐदाळे, अशोक कांबळे, यल्लापा ऐदाळे, पांडुरंग जगधने, सुभाष कांबळे, संजय विलास कांबळे, विक्रांत कांबळे, विनोद कांबळे, रोहन विटेकर, स्वप्निल ऐदाळे, ॠतुराज कांबळे, विशाल कांबळे, वसंत कांबळे, हर्षद ऐदाळे, प्रसाद कांबळे, दरिकांत कांबळे, शृतिक कांबळे, हर्षवर्धनसंजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करताना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व मान्यवर