Header Ads

अवकाळी,गारपीठामुळे जतचा शेतकरी दुहेरी संकटात | द्राक्ष,डाळींब बागायदारांना नुकसान भरपाई द्यावी ; विक्रम ढोणे


जत,प्रतिनिधी :  जत तालुक्यातील उमदी उटगी बिळूर वज्रवाड साळमळगेवाडीसह तालुक्यातील अनेक गावामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे डाळिंब व द्राक्षेबागाची फार मोठ्या प्रमाणात नुसकान झाले असून सरकारने या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी धोरणात्मक ठोस निर्णय घेऊन शेतकरी बांधवांना मदत करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
दुष्काळ सततच्या अवर्षण परिस्थितीशी दोन हात करून प्रसंगी टँकर लावून जीवापाड जपलेल्या डाळिंब व द्राक्ष बागेची फळे विक्रीस आली असताना कोरोनाच्या संकटात देशभर लॉगडाऊन झालेे.परराज्यात जाणाऱ्या द्राक्ष व डाळिंब फळांची विक्री थांबली.त्यातच रवीवारी बिंळूर,उमराणी परिसरात अवकाळीचा गारासह पाऊस होऊन अनेक द्राक्ष,डाळिंब बागा जमीनदोस्त झाल्याने जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना या दुहेरी संकटात आला आहे.या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक ठोस निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.शेतकरी बांधवांची अपरिमित हानी झाली असून कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची गरज आहे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सांगली जिल्हातील असल्याने त्यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत आणि राज्य सरकारने मदतही जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,असे ढोणे यांनी मागणी केली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.