जत,प्रतिनिधी : नवाळवाडी ता.जत येथील विवाहितेने दोन मुलासह विहिरित उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना गुरूवारी उघडकीस आली.
बेबीजांन इब्राहिम नदाफ (वय 32),जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.