Header Ads

कोरोना | अँड.चन्नाप्पा होर्तीकर,सिध्दू शिरसाड यांच्याकडून मदत |तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दिले जीवनावश्यक वस्तूचे किट

 



जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य तथा माजी जि.प.सदस्य चन्नाप्पा होर्तीकर व  सिध्दू शिरसाड यांनी पुढाकार घेत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचे शंभर कीट सुपूर्द केले. त्यांच्या या उपक्रमाचे तहसीलदारांनीही कौतुक करत आभार व्यक्त केले.यावेळी यावेळी मंडल अधिकारी संदीप मोरे, व्यापारी असोशिएशनचे किरण बिज्जरगी आदी उपस्थित होते.
         अँड.चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले की, जत तालुका दुष्काळी आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांचा तालुका आहे.कोरोनोमुळे सध्या गेल्या महीन्यापासून कडक संचारबंदी लागू आहे. त्यातच इस्लामपूर आणि लगतच्या विजापूर जिल्हयात कोरोनो रूग्ण आढळून आले आहेत.यामळे सर्व सीमा बंद आहेत. घराबाहेर पडणेही बंद आहे. याचा मोठा परिणामगरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जगण्यावर झाला आहे.अशा काळात लोकांना मदत करणे गरजेचे आहे, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ना. जयंत पाटील यांनी केले होते. 
           ना.जयंत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चन्नापा होर्तीकर व सिध्दू शिरसाड यांनी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे शंभर जीवनावश्यक कीट दिले. सुदैवाने आपल्या तालुक्यात कोरोनो रूग्ण नाही.परंतु आता विजापूरला रूग्ण सापडले आहेत.  पूर्व भागाचा विजापूरशी संपर्क मोठा आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही या भागातील सीमा बंद केल्या आहेत. तसेच लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षीत आहे या काळात लोकांनी काळजी घ्यावी बाहेर पडु नये असे आवाहन अँड. होर्तिकर  यांनी केले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.