Header Ads

जत | जागर फाऊंडेशन यांच्याकडून अन्नधान्याचे किट वाटप | जागर फाऊंडेशने जपला माणुसकी धर्म


जत,प्रतिनिधी : स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भिमराव मोरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून त्यांनी गरजू व्यक्तींना अन्नधान्यचे वाटप केले.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.सर्व कामे बंद असल्याने मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य संपत आले आहे. आशा परिस्थितीमध्ये माणुसकी दाखवत जागर फाउंडेशनच्या मार्फत अन्न धान्यचे वाटप करण्यात आहे. लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन 400 जीवनावश्यक वस्तुंचे किटचे वाटप आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. किटचे वाटप करत असताना परिसरातील महिलांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचे समाधान पाहायला मिळाले व देवाचा रूपाने परसरामने आम्हाला मदत केली. या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना आम.विक्रमसिंह सावंत म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये जागर फाउंडेशन मार्फत गोरगरीब व मजुरांसाठी अन्नधान्य स्वरूपात किटचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविला.


यावेळी बोलतांना परशुराम मोरे म्हणाले की, जागर फाऊंडेशन नेहमीच जनतेच्या मदतीसाठी धावून जाते पुढील काळातही असेच काम सुरू राहील.कोरोनावरती मात करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.जागर फाऊंडेशन हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जाते. दुष्काळ, महापूर यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत.दुष्काळातही पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले आहे.जत शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र औषध फवारणीही करण्यात अली जागर फाउंडेशन च्या माध्यमातून शहरात सर्वत्र औषध फवारणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जागर फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.