संचार बंदीतही जत तालुक्यात दारू विक्री | आमदार सांवत यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीत तक्रार
जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणुची उपाययोजना म्हणून राज्यभर संचार बंदी करण्यात आली आहे.जत तालुक्यात सर्व दुकाने बंद आहेत.पोलीसांच्या धास्तीने अत्यावश्यक सेवेसाठीही माणसे बाहेर फिरत नाहीत.अशी आवस्था असतानाही तालुक्याच्या सीमावर्ती भागात मात्र दारू अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.अशी तक्रार थेट पालकमंञ्यासमोर करून आमदार विक्रमसिंह सांवत यांनी जत,उमदी पोलीसांच्या कारभाराची पोलखोल केली.
कोरोनाचा प्रभाव वाढू नये,गर्दी टाळावी म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे.यात दारूची मान्यताप्राप्त दुकाने बंद आहेत.मग तालुकाभर राजरोसपणे दारू विक्री होतेच कशी,अनेक गावातील संरपच थेट मला फोन करतात,मी अनेक वेळा पोलीसांना सांगूनही कारवाई होत नाही,असा पोलीसांच्या कारभाराचा पाडाच आ.सांवत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीत मांडला.
जतेत कायदा सुव्यवस्थेचा बाजार मांडणाऱ्या दारू विक्रेत्यांना रोकण्यात पोलीस अपयशी का ठरतात,की जाणूनबुजून पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.
बंदीनंतर जत,उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे सात-आठ ठिकाणी डिवायएसपी जगदाळे यांच्या पथकाने कारवाया केल्या आहेत.तरीही दारू विक्री सुरुच असल्याचे आ.सांवत यांनी पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.असा प्रकार रोकण्याचे आदेश पोलीसांना पालकमंञ्यांनी दिले.
एका मोठ्या कारवाईचे गौडबंगाल ?
जत तालुक्यातील एका मोठ्या दारू विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईत काळभेर झाल्याची चर्चा आहे.संचारबंदीत अनेक दिवसानंतर झालेल्या या कारवाईत मोठे गौडबंगाल झाले असल्याची चर्चा आहे.
पोलिस ठाण्याला केले,खाजगी मालमत्ता
जत पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांने पोलिस ठाणे खाजगी मालमत्ता केल्याची चर्चा आहे.किरकोळ कामासाठी आलेल्या माणसांनाही या अधिकाऱ्यांने विनाकारण मारहाण केल्याची चर्चा आहे. मी या ठाण्याचा मालक आहे,अशा अर्विभावात हे ठाणे चालविले जात आहे.जतच्या नागरिकांसह काही कर्मचारीही अशा कारभाराला वैतागल्याची चर्चा आहे.