जत | इतर जिल्ह्यात अडकलेले शिक्षक,विद्यार्थी,कर्मचाऱ्यांना घरी पाठवा ; आमदार कपिल पाटील 


 

 


 
जत,प्रतिनिधी : कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यातील शिक्षक,स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, शासकीय सेवेतील कर्मचारी आणि कामगार अडकून पडले आहेत.त्यांना घरी जाण्यासाठी विना अट पासेस उपलब्ध करुन द्यावेत,अशी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती जत तालुका शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.

राज्यात अनेक ठिकाणी इतर जिल्ह्यातील शिक्षक कार्यरत असून आपले शैक्षणिक कार्य पार पाडण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडून अध्यापनाचे कार्य करत आहेत. 

पुणे, मुंबईसह स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इतर जिल्ह्यांत गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत.

अनेक कामगार आणि कर्मचारी वेगवेगळ्या जिल्ह्यात थांबले आहेत.

1 महिन्याहून अधिक काळ हे सर्व शिक्षक, विद्यार्थी, कामगार व कर्मचारी इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर एकटेच रहात आहेत.1 मे नंतर शिक्षक, कर्मचारी यांना प्रत्येक वर्षी अधिकृत सुट्ट्या देण्यात येतात.या शिक्षक, विद्यार्थी, कामगार आणि कर्मचारी यांना 1 मे महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर लागलीच 2 मे पासून स्वतः च्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासेस उपलब्ध करून द्यावेत व सोबतच ज्यांना जाण्यासाठी स्वतः चे वाहन उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी बसेसची सोय उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे


 

   ReplyForward