Header Ads

सोन्याळ 2 मे पासून पाच दिवस लॉकडाऊन

सोन्याळ,वार्ताहर :

सोन्याळ ता.जत दिनांक 2 मे 2020 ते 6 मे 2020 अखेर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.त्यासंदर्भात झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या पाच दिवसाच्या कालावधीत सर्व ग्रामस्थ,विविध व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक,दुधउत्पादक, शेतकरी आदींनी या लॉकडाऊनला सहकार्य करावे.लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही,यासाठी सर्वांनी खबरदारी/दक्षता घ्यावी.लॉकडाऊन नियमांचे भंग केल्यास रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.