माडग्याळ | डाळींब बागायतदार शेतकऱ्यांना 10 लाखाचा गंडा |
 

 


 
माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे डाळिंब व्यापाऱ्यांनी डाळींब बागायतदार शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घालून फसवणूक प्रकार समोर आला आहे.माडग्याळ येथील दहा शेतकऱ्यांची सहा ते सात लाख रुपये डाळिंब व्यापाऱ्यांनी बुडवले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.त्या फसवलेल्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सनमडी येथील एका व्यापाऱ्याने माडग्याळ येथील दहा ते बारा डाळींब बागायतदार शेतकऱ्याकडून डाळींब विकत घेतले होते.ठरलेल्या रक्कमेपैंकी काही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती.उर्वरित रक्कम काही दिवसानंतर देण्याचे ठरविण्यात आले होते.दरम्यान या रक्कमेचे काही शेतकऱ्यांना या व्यापाऱ्याने चेकही दिले आहेत.मात्र ते 

चेक बँकेमध्ये वटले नाहीत. 

शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त़्यांनी पोलीसांना कळविले होते.त्यावेळी संबधित व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांनी दोन महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र दोन महिने होऊनही पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी पोलीसात धाव घेतली.मात्र त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.बिराप्पा लक्ष्मण हाके,शंकर सावंत,उमेश सावंत, कृष्णदेव सावंत,महेश माळी,पांडुरंग माळी, बिराप्पा आबांना हाके,महादेव जाधव,अभय माळी या सर्व शेतकऱ्यांची डाळींब व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची तक्रार आहे.