Header Ads

माडग्याळ | परिसरातील दवाखान्याची तपासणी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई ; बोगस डॉक्टर सापडल्यास थेट जेलवारी

 

 


माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळून येऊ नये,यासाठी येळवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार कणसे व त्यांच्या पथकाने अचानक पणे त्यांच्या अधिपत्या खालील सतरा गावातील हॉस्पिटल व दवाखाने यांची झाडाझडती घेतली.दवाखान्याच्या परवानगीच्या कागदपत्रांची तपासणी केली.अचानक झालेल्या या कारवाईने बोगस डॉक्टर हबकले आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्या मार्गदर्शनाने डॉ.कणसे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय खडतरे,आरोग्य सहायक एस.बी.परीट,पी.एस खुळे,अनिता यादव, व्ही.आर बजंत्री व डी.आर गाडवे यांच्या पथकाने ही धडक तपासणी मोहीम राबविली.यामुळे जत तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी डॉ तुषार कणसे म्हणाले की,"वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अथक परिश्रम, सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण व कष्टाची तयारी असावी लागते.त्यासाठी आयुष्याची पाच ते सहा वर्षे खर्ची घालावी लागतात.तेव्हाच आपणाला डॉक्टर म्हणून अधिकृत विद्यापीठाची पदवी मिळते.परंतु जत सारख्या दुर्गम भागातील जनतेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही अर्धशिक्षित लोक स्वतःस डॉक्टर समजून,आर्थिक लोभापायी जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.त्यामुळे इथून पुढच्या काळात तालुक्यात एकही बोगस व्यावसायिक आढळणार नाही यांची दक्षता आम्ही घेणार आहोत.त्यासाठी भविष्यात अधिक कठोर पावले उचलली जाणार आहेत.आणि जो कोणी या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालेल त्याच्यावर देखील ठोस कारवाई करण्यात येईल.बोगस डॉक्टराबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या धडक तपासणी मोहिमेचे सर्वसामान्य जनतेतून मात्र कौतुक होत आहे.

 

 


येळवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार कणसे यांनी सतरा गावातील हॉस्पिटल व दवाखाने परवाने,शासकीय मान्यताची तपासणी केली. 


Blogger द्वारे प्रायोजित.