Header Ads

इस्लामपूरशी संपर्क 89 जणांना होम क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश
 

जत,प्रतिनिधी : इस्लामपूर येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या कुटुंबाने आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमासाठी जत तालुक्यातील त्यांचे पाच ते सात नातेवाईक गेले होते. त्यांच्यासह संबंधित घरातील सर्वचजण व संपर्कात आलेल्या सुमारे 89 नागरिकांना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्याचे आदेश तहसीलदार सचिन पाटील यांनी बुधवारी दिले.कोरोनाग्रस्त कुटुंबाने इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमासाठी एकाच मोटारीतून

जतमधील मोरे कॉलनी,कुंभारी व शेगाव येथील पाच ते सातजण गेले होते. परत आल्यानंतर इस्लामपूरमधील संबंधित कुटुंबास कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भावाची चर्चा सुरु झाली. नंतर इस्लामपूर येथील

चौघा यात्रेकरूंचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, जत येथील मोरे कॉलनीमधील संबंधित कुटुंब घराला

कुलूप लावून ग्रामीण भागात राहण्यास गेले.मागील आठ दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या घरी

हेलपाटे मारत होती.मोरे कॉलनीत भिती ; जत शहरातील मोरे कॉलनी येथील पाच ते सातजण इस्लामपूर येथील भोजनाच्या कार्यक्रमासाठी जाऊन परत आले आहेत, त्यानंतर घराला कुलूप लावून ते इतर ठिकाणी राहण्यास गेले, याची माहिती मोरे कॉलनी परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 


   


Blogger द्वारे प्रायोजित.