Header Ads

कोरोना : आमदार विक्रमसिंह सांवतांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

 


 

संख,वार्ताहर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र संख आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देत आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स,नर्स व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क व सँनीटाईज दिले.

यावेळी सरपंच सौ.मंगलताई पाटील,उपसरपंच सदाशिव दर्गाकर,सुरेश पाटील,पोलिस पाटील,एम.आर.जिगजेणी,हणमंतराव पाटील,साहेबगोडा पाटील,तसेच संख ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार सांवत यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली.कोरोना उपाययोजना बाबत माहिती घेतली.केंद्रात येणाऱ्या व संशयास्पद असणाऱ्या नागरिकांना तात्काळ उपचार करावेत,कायम वैद्यकीय अधिकारी,नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे.

संख आरोग्य केंद्रातील अस्वच्छते बरोबर केंद्रातील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी,अशा सुचना आमदार सांवत यांनी यावेळी दिल्या.

त्याशिवाय केंद्रातील अस्वच्छता व अस्तावेस्त पडलेल्या साहित्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत,वेळीच गंभीर व्हावा,यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही,कारवाई केली जाईल,अशा सक्त सुचना दिल्या.

दरम्यान आमदार सांवत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील चेक पोस्ट,उमदी पोलिस ठाणे,उमदी प्रा.आ.केंद्र,काही ग्रामपंचायतीना भेट देत मास्क व सँनिटायझर दिले.

 

 

संख प्राथमिक आरोग्य केंद्राला मास्क,सँनीटाझरचे वाटप करताना आमदार विक्रमसिंह सांवत

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.