Header Ads

कोरोना : डफळापूर प्रा.आ.केंद्र दक्ष ;डॉ.अभिजित चोथे

 


डफळापूर, वार्ताहर : डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात कोरोनाचा  फैलाव रोकण्यासाठी सतर्कता बाळगली आहे.आरोग्य केंद्राच्या परिसरात असा एकही रुग्ण नाही.कोणतीही भिती,अथवा संशय बाळगू नका,काहीही संशास्पद वाटल्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.अभिजित चौथे यांनी दिली.

डॉ.चोथे म्हणाले,आरोग्य केंद्राच्या

परिसरात 14 गावात परदेशातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईनमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.त्याशिवाय परिसरात बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींना रोग प्रतिबंधित औषध फवारणीच्या सुचना दिल्या आहेत.

डॉ.चोथे म्हणाले,सर्व आशा, अंगणवाडी सेविका, व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना साथी बद्दल मार्गदर्शन करून शासनाच्या सर्व सूचना दिल्या आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेले प्रवासी व पर जिल्ह्यातून आलेले नागरिक यांची कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.तसेच सर्वांना हस्तपत्रिकांचे वाटप केले आहे.सर्व 14 ग्रामपंचायतींना कोरोना उपाय योजना,सतर्कता या विषयी माहिती देण्यात आलेली.परदेश,व बाहेरून आलेल्या आलेल्या नागरिकांवर आमचे 

कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.परदेशातून आलेल्या नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे.दिवसातून चार वेळा त्यांना कर्मचारी भेट देऊन उपचाराबाबत माहिती देतात.

त्याशिवास दैनंदिन सर्व्हेक्षण चालू असून दररोज येणारे नवीन प्रवासी यांची तपासणी करून त्यांची काळजी घेतली जात आहे.परिसरातील ग्रामपंचायतींना स्वच्छता, औषध फवारणी व त्यांनी करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भिती बाळगू नये,पुढील आदेश येईपर्यत घराबाहेर पडायचे नाही.शासनाच्या सर्व सुचनांचे काटेकोर पणे पालन करा.हे एक युद्ध आहे,आणि आपण हे जिंकायचे आहे,असे आवाहन डॉ.चोथे यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.