Header Ads

जत | जूनपर्यत म्हैसाळचे पाणी शेवटच्या टोकापर्यत पोहचेल ; खा.संजयकाका पाटील | डफळापूरात पाहणी ; कँनॉल फोडणाऱ्या गुन्हे दाखल होणार |


 

डफळापूर, वार्ताहर : जूनपर्यत योजनेत समाविष्ट गावापर्यत म्हैसाळचे पाणी पोहचविण्याचे नियोजन आहे.कोरोना,पाणी टंचाईत सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी डफळापूर येथे दिली.
डफळापूर तलाव,कँनॉलची पाहणी खा.पाटील यांनी केली.यावेळी स्थानिक पदाधिकारी,म्हैसाळ योजनेचे अधिकारी उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले,म्हैसाळ योजनेला पंतप्रधान योजनेतून पैसे मिळालेल्याने ही योजना पुर्णत्वाकडे आली आहे.उर्वरित कामे गतीने सुरू आहेत.जून एंडपर्यत योजनेत समाविष्ट शेवटच्या गावापर्यत पाणी पोहचणार आहे.पाणी सर्व गावांना देण्याचे नियोजन आहे.तरीही काही गावात कँनॉल फोडण्याचे काही प्रकार घडत आहेत.ते थांबावेत अन्यथा कायदेशीर कारवाई होईल.

जत पश्चिम भागातील कँनॉल पुर्ण झालेल्या सर्व गावात पाणी सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी,सामान्य जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून करत आहोत.शासनाकडूनही या लोकांना मदत करावी अशा सुचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,असेही खा.पाटील यांनी सांगितले.

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.