Header Ads

करजगीत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानाची तपासणी

 

 


करजगी,वार्ताहर : कोरोना विषाणु पार्श्वभूमीवर करजगी ता.जत येथे अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असणाऱ्या किराणा दुकानाची पाहणी शासन आदेशानुसार करण्यात आली. सध्या संचार बंदीचा फायदा घेत काही दुकानदार भेसळ साहित्य,दरवाढ करून माल विकत आहेत.त्या पार्श्वभूमीवर सर्व दुकानांची तपासणी करण्यात आली.उपलब्ध माल,दराची माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारे भेसळ साहित्य अथवा दर वाढवून विकू नये,शासन आदेशानुसार दुकानाचे वेळा पाळाव्यात,अशा सुचना दुकानदारांना देण्यात आल्या.यावेळी संरपच साहेबपाशा बिराजदार,ग्रा.प.लिपिक साबू हुमाणे,आरोग्य सेवक राजू तेली,पोलीस पाटील,कोतवाल उपस्थित होते.

 

करजगी ता.जत येथील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाची पाहणी करण्यात आली.

Blogger द्वारे प्रायोजित.