Header Ads

जत | तालुक्यात स्वस्त धान्याचे घरोघरी वाटप सुरू | माणसी 3 किलो गहू,2 किलो तांदूळ,मोफत तांदुळ मात्र नाही

 जत : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचार बंदीत शासनाने स्वस्त धान्य घरोघरी जाऊन वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार जत तालुक्यातील दुकानदारांनी अन्नसुरक्षा,बिपीएल,अत्योंदय कार्डधारकांना स्वस्त धान्याचे घरोघरी वाटप सुरू केले आहे.सध्या माणसी 3 किलो गहू - 2 रूपये,2 किलो तांदुळ-3 रूपये,तर तूर एक किलो 55,हरबरा 45 (तूर किंवा हरबरा यापैंकी एकच डाळ)अशा दरानुसार वाटप केले जात आहे. सध्या मोफत तांदूळ मात्र अद्याप तालुका प्रशासनाकडे आलेला नसल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे पुकारलेल्या संचारबंदीत स्वस्त धान्य दुकानात गर्दी होऊ नये म्हणून शासनाने एप्रिल महिन्यापासून कार्डधारकांच्या घरोघरी स्वस्त धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहे.त्यानुसार तालुक्यातील धान्य दुकानदारांनी भाड्याने टेम्पो घेत माल घरोघरी पोहचविण्यास सुरूवात केली आहे.सध्या जुन्या पध्दतीने अन्नसुरक्षा,बिपीएल,अत्योंदय कार्डधारकांनाच धान्याचे वाटप सुरू आहे.शासनाने घोषित केलेला 5 किलो मोफत तांदुळ अद्याप तालुका प्रशासनाकडे आलेला नसल्याने तो उपलब्ध होताच वाटप करण्यात येणार आहे.त्याशिवाय पांढऱ्या कार्ड धारकांना मात्र कोणतेही धान्य उपलब्ध झालेले नाही.सध्या संचार बंदीत सर्वजण अडचणीत आहेत.सर्वांचे हात थांबले आहेत.त्यामुळे सर्व कार्ड धारकांना धान्याचे वाटप व्हावे अशी मागणी आहे.

 

मोफत तांदुळ उपलब्ध होताच वाटप

 

सध्या आमच्याकडे अन्नसुरक्षा,अत्योंदय,बिपीएल कार्ड धारकांचे धान्य उपलब्ध झाले आहे.मोफत तांदुळ अद्याप मिळालेला नाही.तो उपलब्ध होताच त्यांचे स्वतंत्र वाटप करण्यात येणार आहे.

 

- सचिन पाटील,तहसीलदार

 

 

उपलब्ध धान्याचे घरोघरी वाटप

 

सध्या आम्हाला वाटपासाठी मिळालेल्या धान्याचे वाटप घरोघरी करत आहोत.जेवढ्या कार्डधारकांना उपलब्ध आहे,तसे वितरण सुरू आहे.सध्या स्वँप मशिनद्वारे वाटप करण्यात येत आहे.

 

अशोक चव्हाण,स्वस्त धान्य दुकानदार

डफळापूर ता.जत येथे स्वस्त धान्याचे घरोघरी वाटप सुरू आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.