Header Ads

जत | बँक कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे

 

 

 


 

जत,प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र अगदी झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे, तरीही या देश सेवक विविध बँकातील अधिकारी,कर्मचारी काम करत आहे.जनतेच्या सेवेसाठी ते राबत आहे.त्यांनाही कोरोनाचा धोका आहे.त्यामुळे शासनाने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण द्यावे,अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.

राज्यभरात कोरोनाने सर्व लॉकडाऊन असतानाही शहरी,ग्रामीण भागातील सर्व राष्ट्रीयकृत्त,अर्बन,खाजगी बँका सुरू आहे.त्या राबणारे अधिकारी,कर्मचारी एकप्रकारे या महामारीत देश सेवा करत आहेत.त्यांनाही या कोरोना विषाणुचा धोका आहे. बँक दररोज शेकडो लोक येत असतात.कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भिती असताना सुद्धा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी लोकांच्यासाठी काम करत आहेत.त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण द्यावे.त्याशिवाय या कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून राबणाऱ्यांना सर्वांना शासनाने विमासह सुरक्षेसाठी संरक्षण द्यावे,अशीही मागणी साबळे यांनी केली आहे.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.