Header Ads

ट्रँक्टर पलटी होऊन वायफळचा तरुण ठार 


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वायफळ येथील सिध्देश्वर हरीशचंद्र पाटील (वय 25) हा ट्रँक्टर पलटी होऊन ट्रँक्टरखाली आल्याने जागीच ठार झाला.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सिध्देश्वर हे आपल्या स्वतःच्या शेतात शेणखत घालण्यासाठी ट्रँक्टर ट्रॉलीसह घेऊन गेला होता.शेणखत खाली करून घराकडे येत असता ट्रँक्टर पलटी झाला. यात तो ट्रँक्टर खाली गेल्याने त्याच्या छातीवर,पाठीमागील संपूर्ण बाजूस व हाता-पायाला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांचा रक्तस्राव होऊन जागीच मुत्यू झाला.ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

 

Blogger द्वारे प्रायोजित.