बेनवूरमधील ऊसतोड कामगारांना संभाजी ब्रिगेडकडून भाजीपाला वाटप


आंवढी,वार्ताहर : बेवनूर ता.जत जि सांगली येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बिड येथील 48 ऊसतोड कामगारांना भाजीपाला वाटप केले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.सुधिर नाईक,सामाजिक कार्यकर्ते शंकर पारेकर,  उपसरपंच विजयकुमार नाईक,पोलीस पाटील महादेव शिंदे, किरण सरगर, शैलेश गुरव, उपस्थितीत होते.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे या परिसरात ऊसतोडीसाठी आलेले बिड येथील हे ऊसतोड कामगार येथे थांबले आहेत.त्यांच्या हाताला सध्या कोणतेही काम नाही.त्यामुळे त्यांची उपासमार होत होती.बेवनूर परिसरातील संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संस्थासह,दानसूर व्यक्तींना त्यांना मोठी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.बेवनूर ता.जत येथील ऊसतोड कामगारांना भाजीपाला वाटप करताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते