Header Ads

सरपंच परिषदेकडून पंचायत समिती, एमएसईबी कर्मचाऱ्यांना सँनिटायजर वाटप

 


जत,प्रतिनिधी : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जत तालुका शाखेने पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी व वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सँनिटायजर वाटप केले.यावेळी जत पंचायत समिती गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील,कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर,बसर्गीचे उपसरपंच किशोर बामणे,विस्तार अधिकारी मनोज जाधव, श्री.संकपाळ, वीज मंडळाचे सुनिल माने, सुनिल बंडगर, महेश शिंदे, महालिंग माळी यांच्या सह पंचायत समिती व वीज मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर म्हणाले,जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे.आता ही लढाई जिंकण्यासाठी सतर्क रहा,गावासह नागरिकांना जपा. 

 

सरपंच परिषदेकडून पंचायत समिती, एमएसईबी कर्मचाऱ्यांना सँनिटायजर वाटप करताना संरपच बसवराज पाटील,राजाराम जावीर
 

 


Blogger द्वारे प्रायोजित.