Header Ads

सोन्याळ | तालुक्यातील जनतेला सरसकट स्वस्तधान्य द्या ; चिंदानंद तेली


सोन्याळ,वार्ताहर : कोरोनामुळे जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,कामगार,पशूपालकांचे रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही,खायाला अन्न नाही,अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने कोरोनाच्या कार्यकाळात सरसकट कार्डधारकांना स्वस्त धान्याचे वाटप करावे,अशी मागणी चिंदानंद तेली(सोन्याळ) यांनी केली आहे.

तेली म्हणाले,कोरोनामुळे दिलासा देताना शासनाने अन्नसुरक्षा,अत्योंदय या कार्डधारकांना स्वस्त धान्य व मोफत तांदुळचा लाभ दिला जात आहे. मात्र शासनाच्या या योजनेपासून सुमारे 20 टक्के गोरगरीब  घटकांचेही लॉकडाऊन मुळे हाल सुरू आहे.सध्या कुणाच्या हाताला काम नाही,शेतमजूर,कामगारासह शेतकरीही अडचणीत आला आहे.त्यातच सातत्याने दुष्काळी जीवन जगणाऱ्या जत तालुक्यातील सर्व घटकांतील रेशकार्ड धारकांना स्वस्त धान्य व मोफत तांदुळ वाटप करावे,असे आवाहन तेली यांनी केले आहे.

 

Blogger द्वारे प्रायोजित.