Header Ads

उमदीत विनामास्क 17 जणावर गुन्हे,7 जण होम कोरोटाईंनमध्ये 


 

उमदी,वार्ताहर : उमदी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरलेने एकूण 17 जणावरती 188 प्रमाणे,बाहेरून आलेल्या 7 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 व कोव्हिडं -19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना होंम कोरोंटाईन करण्यात आले आहे.यापुढेही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.नवीन आदेशानुसार सांगली जिल्ह्यात मास्क घातल्याशिवाय व आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये अन्यथा गुन्हा दाखल करून कोर्टात खटला दाखल करून 5000/- रु दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रभावामुळे जिथे असाल तेथेच रहा कोणीही कोठेही फिरू नका व तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरा,अशा सक्त सुचना कोळेकर यांनी दिल्या आहेत.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.