Header Ads

जत | कोरोना : सरपंचांना पोलिस संरक्षण द्या ; बसवराज पाटील |


 
जत,प्रतिनिधी : कोरोना या जीवघेण्या संकटात ज्याप्रमाणे डॉक्टर,पोलिस यांची भुमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात या संकटाचा सामना गावचे सरपंच हे करीत आहेत,त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भूमिका नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा राज्य सरकारने ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सरपंचांना पोलिस संरक्षण द्यावे,अशी मागणी जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

 

त्यानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी नुसार काम करीत आहे. सरकारने मात्र या संकटाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील गावोगावचे सरपंच मंडळीकडे दुर्लक्ष केले आहे. सरपंच सुध्दा जीव धोक्यात घालून गावचे संरक्षण करत असल्यामुळेच कोरोना हे संकट वेशीबाहेर ठेवण्यात यश येत आहे. गेल्या एक महिन्यापासून सरपंच जागता पहारा देत आहेत.याशिवाय प्रत्येक गावातील सरपंच चोख कामगिरी करत असल्याने रेशनिंगच्या माध्यमातून गोरगरिबांच्या अन्न-पाण्याची सोय होत आहे.आरोग्य खात्याच्या माध्यमातून आरोग्य चांगले रहात आहे. खरे तर सरपंचांचे अनेक प्रश्न आहेत. पण बिचारे आपले प्रश्न मागे ठेवून ग्रामीण भागात लोकांची सेवा करत आहेत. खरे तर शहरात साधन सुविधा खुप असतात त्या प्रमाणात गावात सुविधा नसतात. तरीपण सरपंच मंडळी जिवाचे रान करीत आहेत. औषध फवारणी, गोरगरिबाला मदत मिळवून देणे,आरोग्य जपणे,  लॉकडाऊनच्या काळात लोक जागृती करणे,परगावाहून आलेल्या लोकांची माहिती शासनाला कळविणे आदी महत्वाची कामे करत असताना गावातील अनेक हुल्लडबांजा बरोबर वाद उद्भवतात त्यामुळे सरपंच यांना धोका पत्करून काम करावे लागत आहे म्हणून गावाचे संरक्षण करणाऱ्या सरपंचांना पोलिस संरक्षण महत्त्वाचे आहे. सरपंच कार्यशिल आहेत म्हणून आज ग्रामीण भागात संकट कमी प्रमाणात आहे, मग असे असतांना या लोकांची कामगिरी नजरेआड करता येणार नाही, राज्य सरकारने जे सरपंच लोक कोरोना या संकटाच्या लढाईत मैदानावर काम करतात त्या सरपंचांना पोलिस संरक्षण द्यावे,असेहा पाटील म्हणाले. 


 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.