Header Ads

जत | जत बंद दुसऱ्यावेळी 100 टक्के लॉकडाऊन | कोरोना विरोधात प्रशासन दक्ष |


जत,प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील घेरडी व कर्नाटकातील विजापूर,बेळगांव जिल्ह्यात वाढत असलेले कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात आजपासून पुन्हा पाच दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. हॉस्पिटल, मेडिकल सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे.

 

जत तालुक्याच्या लगत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील घेरडी येथे कोरेनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे उत्तर भागातील शेगाव,वायफळ,बनाळी,येळवी,सनमडी,माडग्याळ सह जत शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.भविष्यातील खबरदारी म्हणून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा बंद ठेवण्यात आला आहे.

 

नगरपरिषद,पोलीस व महसूल विभागाकडून नागरिकांना सर्व प्रकारे मदत केली जात आहे. दुध,भाजीपाला,फिल्टर पाणी घरपोच करण्यात येत आहे.आजपासून ता.3 संष्टेबर पर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.

 

जत बंदच्या पार्श्वभूमीवर विजापूर,चडचडण सह परिसरातून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात येत आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.