Header Ads

वाळेखिंडीत अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने जप्त | तीन लाखाचा दंड


जत,प्रतिनिधी : वाळेखिंडी ता.जत येथून बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहने वाळू विरोधी पथकांने पकडत दोन ब्रास वाळू जप्त करत 3 लाखाचा दंड केला.

वाळेखिंडी,कुंभारी,शेगाव परिसरात सुरू असलेल्या वाळू तस्कराविरोधात मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे,तलाठी अंजिरा जाधव,निखिल पाटील यांच्या पथक छापामारी करत असताना  वाळेखिंडी नजिकच्या भवानी डोंगराजवळ नवनाथ भाऊसाहेब शिंदे यांच्या मालकीचा महिंद्रा टँक्टर क्र.एमएच-10,सीएक्स-2921 सोमवारी रात्री तर पवन तात्यासाहेब शिंदे यांच्या मालकीचा 407 टँम्पो क्र.एमएच-09,एल-3931 हा विना परवाना वाळू उत्खनन करून वाहतूक करीत असताना पथकाने पकडला.यात प्रत्येकी 1 ब्रास प्रमाणे दोन ब्रास वाळू जप्त करत,तीन लाख रूपये दंडाची कारवाई केली. 

 

कुंभारी महसूलच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारी जप्त केलेली वाहने

Blogger द्वारे प्रायोजित.