Header Ads

उमराणीत तरूणांचा शेततलावात बुडून मृत्यू


उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत तरूणाचा शेततलावात पाय घसरून पडल्याने बुडून मुत्यू झाला.बसवराज शिवाजी वाघमारे (वय 19)असे मयत तरूणाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,बसवराज यांने नुकतीच दहावीचे परिक्षा दिली आहे.सुट्या असल्याने तो शेळा राखत होता.सोमवारी तो रोजप्रमाणे शेळ्या राखण्यासाठी गेला होता.तहान लागल्याने बिराजदार यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी उतरला.त्यात त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात बुडाला पोह्यायला येत नसल्याने त्याचा बुडून मुत्यू झाला.बऱ्याच वेळ झाला तरी घरी परतला नाही.म्हणून त्याची शोधाशोध घेतला असता हा प्रकार समोर आला.दरम्यान याबाबत अद्याप जत पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही.


Blogger द्वारे प्रायोजित.