Header Ads

कोरोना : नागरिकांनी प्रशासनचे आदेश पाळावेत ; तालुका कृषी अधिकारी मेडिदार यांचे आवाहन






 

बालगाव,वार्ताहर : कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी तालुका प्रशासन सर्व प्रकारे उपाय योजना करत आहे.स्वस्त धान्य दुकानचे माल घरोघरी पोहच केले जात आहे. ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधित औषध फवारणी स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती न बागळगता लॉकडाऊनचे नियम पाळा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एच.एस.मेडिदार यांनी केले.त्यांनी बालगाव,बोर्गी,हळ्ळी सह परिसरातील गावातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थांनी संवाद साधला.

मेडिदार म्हणाले,कोरोना विषाणूमुळे जगभर सत्तर हजारावर लोंकाना जिव गमवावा लागला आहे.आपल्या देशातही ही संख्या दोनशेच्या आसपास पोहचली आहे.पाच हाजारावर कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत.त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जनतेची सुरक्षा महत्वाची आहे.त्यामुळे केंद्र,राज्य शासन प्रयत्न करत आहे.तालुक्यातही सर्व यंत्रणा गतीने काम करत आहे.गावातील सर्व दुकानदारांनी वेळा पाळाव्यात सोशल डिस्टन्सिंंग पाळाव्यात.सर्वांनी मिळून कोरोनाला हरवायचे आहे.

नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करावे असे आवाहन,मेडिदार यांनी केले.यावेळी एस.एस.कोटी,एल.एम.कांबळे,वसंत लोणी,आर.एम.खव्वेकर,बहुसाहेब तेळसंग,रामू कांबळे, संजय ऐवळे उपस्थित होते.

 

बोर्गी ता.जत येथील बैठकीत बोलताना तालुका कृषी अधिकारी एच.एस.मेडीदार




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.