जतेत हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू रुग्णांना शिवभोजनचे वाटप | दिनकर पंतगे यांचा उपक्रम

 

जत,प्रतिनिधी : सध्या देशात व राज्यात कोरोनाचा लोकांना अतिभयंकर संकटाचा सामना करावा लागत असून संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिबांना काही संस्था हातभार लावण्यात पुढे सरसावले आहेत.त्यात कामगार सेना जत तालुका व लायन्स क्लबच्या वतीने संचारबंदी काळात अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत. कामगार सेना व लायन्स क्लब कडून जत मधील माऊली हॉस्पिटल चे डाॅ. नितीन पतंगे,जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.शरद पवार,उमा हाॅस्पिटलचे डॉ. रविंद्र आरळी,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी,माजी तालुका शिवसेना प्रमुख मलकारी पवार यांच्या हस्ते या हाॅस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवथाळी पार्सल वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रिय योजना शिवभोजन योजना राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व तालुकास्तरावर यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच रूपयात ही थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळी हि जत तालुक्यात एस टी कॅन्टीन मध्ये सुरू करण्यात आली असून याचा जत तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिनकर पतंगे यांनी केले आहे. 

 

जत : कामगार सेना व लायन्स क्लबकडून हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंन,शिवभोजन थाळी पार्सल वाटप करण्यात आले.