Header Ads

सोन्याळमध्ये कोरोना विषाणूला रोकण्यासाठी सतर्कता | बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांच्याकडून पाहणी

 

 


सोन्याळ,वार्ताहर : सोन्याळ ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मकसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर आज जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.आणखीही विविध उपाययोजना राबवण्यासाठी सूचना दिल्या. स्वच्छतेच्या राबवलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.   

सोन्याळ ग्रामपंचायत कोरोना रोखण्यासाठी सतर्क झाली आहे.त्यासाठी काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायततिने

नियुक्त केलेले स्वयंसेवक यांच्या मार्फत या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर

जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी  आज सोन्याळ ग्रामपंचायतला भेट देऊन  पाहणी केली आणि  ग्रामपंचायत प्रशासनास विविध सूचना केल्या.राबवण्यात येत असलेल्या उपाययोजने संदर्भात समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच सौ संगीता निवर्गी, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, जक्कु निवर्गी, सदस्य विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी,क्लर्क अशोक ऐवाळे, डेटा ऑपरेटर कविता होनमोरे, शिपाई बिराप्पा पुजारी आदी उपस्थित होते. 

ग्रामपंचायतीने दोन आठवड्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणे,गल्लीबोळात, मंदिर परिसर,मुख्य चौकात आदी ठिकाणी जंतूनाशक औषधाची ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीनवेळा फवारणी केली आहे. गाव निर्जंतुकिसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.लवकरच कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी स्वच्छता किटचे घरोघरी नियुक्त स्वयंमसेवक यांच्या मार्फत वाटप करण्यात  येणार आहे.  यामध्ये मास्क,सॅनिटाईजर, हॅन्डवाश व साबणं याचा समावेश आहे. आतापासूनच यांच्या वापराबाबत माहिती देण्यात येत आहे.ग्रामपंचायत सोन्याळच्या संकल्पनेनुसार गावातील ग्रामस्थांसाठी 1000 मास्क तयार करण्यासाठी नुकतेच आदेश देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांनी दिली. तसेच ग्रामपंचायत सोन्याळ व किराणा दुकानदार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आणि गर्दी रोखण्यासाठी ग्रामस्थांना आणि विशेष करून दिव्यांग व्यक्तीला घरपोच सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. दिव्यांगांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यात येणार आहे. कोरोना कमिटीची बैठक घेऊन जीवनावश्यक भाजीपालासह किराणामाल घरपोच सेवा द्यायला सुरवात करण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी दुकानदार आणि भाजीविक्रेते यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी घरीच रहावे बाजारात गर्दी करू नये विनाकारण घराबाहेर पडू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या आसपास कोणी बाहेरून नातेवाईक मित्रमंडळी आले असतील तर त्यांची माहिती ग्रामपंचायतीला किंवा आरोग्य विभागाला द्यावी घाबरून जाऊ नये,स्वतःची काळजी घ्यावी तसेच आरोग्य कर्मचारी आशा. अंगणवाडी

सेविका यांच्या मार्फत घरोघरी भेट देऊन माहिती दिली जात आहे,तरी या संकट प्रसंगी सर्वांचे सहकार्य मिळतं आहे तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशा आवाहन सरपंच संगीता निवर्गी आणि ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांचेकडून करण्यात येत आहे.

 

 


जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.सरपंच सौ संगीता निवर्गी, ग्रामसेवक श्रीशैल बिरादार,जक्कु निवर्गी,विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी उपस्थित होते.

 


Blogger द्वारे प्रायोजित.