Header Ads

जत | तालुक्यातील रेशन दुकानदारांना एकच आदेश द्या ; आण्णासाहेब कोडग
आंवढी,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 19/3/2020 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना एप्रिल,मे,जून महिन्याचा रेशनचा माल घरोघरी देण्याचा आदेश दिला आहे.त्यानुसार सध्या रेशन दुकानदाराकडे एक महिन्याचा उपलब्ध झाला आहे.परंतु हा माल वाटप कसा करायचा याबाबत रेशन दुकानदारांची द्विधा अवस्था झाली आहे.

काही दुकानदार पूर्वीप्रमाणे दुकानातच माल वाटप करण्यात येणार असल्याचे कार्डधारकांना मोबाईल मँसेजद्वारे कळविले आहे.तर काहींनी अजून निर्णय घेतला नाही.त्यामुळे मालाचे वाटप कसे करावे,याबाबतचे स्पष्ट आदेश काढावेत व तालुक्यातील सर्वांनाच एकच नियम करून कोणावरही अन्याय होणार नाही असा आदेश काढावा अशी मागणी संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.  

 

कोरोनामुळे गर्दी होऊ नये,यासाठी शासनस्तरावरून पुढील तीन महिन्याचे धान्य कार्डधारकांच्या घरोघरी जाऊन द्यावे असे आदेश आहेत.मात्र काही गावातील दुकानदारांकडून हा आदेश पाळण्यात आलेला नाही,त्यामुळे नागरिकांकडून संरपचांना याबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने रेशन दुकानदारांना शासन निर्णयानुसार सक्त आदेश द्यावेत.

 

- आण्णासाहेब कोडग

जिल्हाध्यक्ष संरपच परिषद,सांगली जिल्हा

 


 


Blogger द्वारे प्रायोजित.