Header Ads

कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा ; डिवायएसपी जगदाळे | सोन्याळ, जाडरबोबलाद, माडग्याळ येथील बैठकीत आवाहन 






सोन्याळ,वार्ताहर : आजच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोनामुळे भयभीत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लढत आहोत.आपल्या देशातसुद्धा या आजारामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा कठीणप्रसंगी प्रशासन आपल्या परीने ठोस उपाययोजना करीत आहे,पोलिस आरोग्य विभागाकडून कठोरता केली,जात आहे.मात्र आम्हाला आता पर्याय उरला नाही,अशी माहिती डिवायएसपी दिलीप जगदाळे यांनी दिली.ते सोन्याळ, जाडरबोबलाद, माडग्याळ येथे सरपंच,सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत बोलताना केले.सर्व ठिकाणच्या बैठका सोशल डिस्टनसिंग मध्ये घेण्यात आल्या.

जगदाळे म्हणाले,आम्ही पोलिस  रात्रंदिवस रस्त्यांवर आपल्या संरक्षणासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. आपला जीव धोक्यात घालून जराही मागे न सरता आपले राष्ट्रीय आणि नैतिक कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा आदर राखून त्यांना सहकार्य करा.आमचे मनोधैर्याचे खच्चीकरण करू नका. कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरोना व्हायरसचे संक्रमण व संसर्ग टाळण्यासाठी आणि या महाभयंकर विषाणूला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी वैद्यकीय सुविधा व अत्यावश्यक कामाशिवाय कृपया विनाकारण घरातून बाहेर पडू नका. आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण देशातील निष्पाप जनता संकटात येवू शकतो. म्हणून नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे आणि संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळाव्यात, स्वतःच्या जिवाबरोबर इतरांचेही जीव वाचवावे असे कळकळीचे आवाहन जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे.यावेळी सोन्याळ येथे सरपंच संगीता निवर्गी, जकप्पा निवर्गी, सोसायटीचे  चेअरमन शिवगोंडा निवर्गी, सदस्य विजयकुमार बगली, लखन होनमोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल बिरादार, काडसिद्द काराजनगी,बसवराज बिरादार, श्रीशैल बिरादार, सैफद्दिन नदाफ, चिदानंद बिरादार,मंडळ अधिकारी बुचडे, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, गावकामगार तलाठी सौ.नुतून मोहकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल वळसंगकर,अशोक ऐवळे, उपस्थित होते.डिवायएसपी जगदाळे,उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी 

जत पूर्वभागात संवेदनशील आणि  मोठ्या गावात जेष्ठ नागरिक,  ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व ग्रामस्तरीय कोरोना कमिटीची बैठक घेऊन जनजागृती केली. 

 

 

जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे ग्रामस्तरावरील कोरोना कमिटीला मार्गदर्शन करताना.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.