Header Ads

हभप तुकाराम महाराज यांच्याकडून 2101 लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप

 संख,वार्ता : गोंधळेवाडी (ता जत) येथील श्री संत बागडे बाबा मठाचे मठाधिपती ह-भ-प तुकाराम महाराज यांनी बागडे बाबा मठाचे भक्त लोक, कामगार व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले.यामध्ये गव्हाचा आटा,पोहे, शेंगतेल ,साबण, जिरे,साखर,मोहरी,तूर डाळ, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंचे कीटमध्ये समावेश आहे.कोरोना यापार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.घरातील लागणारे अन्नधान्य सुद्धा समाप्त झाले आहे. माणुसकी दाखवत व्यक्ती व त्यांचे वाटप केले आहे.यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करून 2001 लोकांना अन्नधान्याचे वाटप करणार आहे.आज 2101 जीवनावश्यक वस्तुंचे कीट बागडे बाबांचे भक्तगण व गरीब लोकांना ह.भ. प तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तुकाराम महाराज याना सामाजिक कार्यात नेहमीच लोकांना मदत करतात.अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जातात. दुष्काळ,महापूर यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत पुराच्या वेळी कपडेलता,इतर साहित्याचे वाटप केले आहे. गेल्या वर्षी जत तालुक्यात भयानक अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी स्वतः स्वखर्चाने मोफत चारा छावणी सुरु केली होती. दुष्काळी पूर्व भागातील ६४ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी संख-गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय अशी पायी दिंडी काढली होती. गुड्डापुर येथे दुष्काळी परिषद घेतली होती. प्रत्येक गावाला पाण्याची टाकी होती.जतच्या यल्लायादेवीच्या यात्रेत पाण्याचा टँकर सुरु केले होते.अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मानवमित्र संघटनेची स्थापन केली आहे.जळीतग्रस्त कुंटुबांना मदत केली आहे. कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या कुंटुबांना आर्थिक मदत केली आहे. गणोत्सव मंडळानी गणेश मूर्तीचे  वाटप केले आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर कालावधीत ग्रामीण भागातील सर्व हॉटेल, खानावळी बंद असल्याने चहापाणी, जेवणाचे हाल होत होते.पोलिसाची आस्थेने विचारपूस केली होती.त्यांच्या नाश्त्याची व जेवणाची माणुसकी दाखवत व्यवस्था केली आहे.तहसिल, प्रांताधिकारी कार्यालय,जत व उमदी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले आहे.तालुक्यात 5 हजार मास्क हे वाटप केले आहेत.यावेळी संजय धुमाळ,वास्तुशास्त्र सरीता लिंगायत, दत्ता सावळे, धानाप्पा राठोळ,श्रीपाद लिंगायत,दामोदर धुमाळ, ज्ञानेश्वर खोत उपस्थित होते.


 


संख (ता जत) येथे ह.भ.प तुकाराम महाराज यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आला.


Blogger द्वारे प्रायोजित.