Header Ads

धक्कादायक | गरीबाच्या मोफत धान्यावरही डल्ला | जत तालुक्यातील स्थिती ; शेकडो किलोचे धान्य काळ्याबाजारात | परवानाधारकांना अभय कोणाचे






 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील किंबहूनासंपूर्ण सरकारी स्वस्त धान्य

दुकानदारांना काय घबाड मिळाले कुणास ठाऊक ? कोरोना संसर्गामुळे मोफत  वाटपासाठी तांदूळ आले खरे पण ग्राहकांना कोणत्या ना कोणत्या कारणांनी कमी धान्य देवून लुबाडणूकीचे प्रकार वाढले आहेत.आधीपासूनच इतरत्र धान्य विकण्याच्या सवयी लागलेले दुकानदार, धान्य वाटप सुरु असतांना भरदिवसा पोतेचे पोते भरून रेशनचा तांदूळ लंपास करण्याचे प्रकार जत तालुक्यात घडत आहेत.काल आवंढी येथे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

 

तालुक्यात असा प्रकार सर्रास सुरु असून लाभार्थ्यांच्या अनेक गावच्या तक्रारी वरिष्ठांकडे जात असून काही दुकानदारांच्या चौकशाचे कागदोपत्री सोपस्कर पुर्ण केले जात असल्याचे आरोप आहेत.वरिष्ठांनी प्रमाणिकपणाने सर्व दुकानदारांची चौकशी केल्यास बरेचसे घोटाळे उघडकीस येतील.

 

जत तालुक्यात काही गावांच्या

रेशन दुकानातून गरजूंना मंजूर धान्य त्या प्रमाणात देण्यात येत नाही तर काही ठिकाणी धान्य आणण्याचे भाडे म्हणून अतिरिक्त पैसे घेतल्या जातात.पैसे दिले नाही तर धान्य कपात केले जाते.धान्य दिल्याच्या पावत्या दिल्या जात नाही. दुकानाबाहेर फलकावर उपलब्ध धान्य, त्यांचे दर, वाटपाचे प्रमाण कधीच लिहिले जात नाही.

 

गावातील वाटप समित्या केवळ कागदावरच आहेत.त्यांना रेशन दुकानदार कधीच माहिती देत नाही. सध्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी गोडावूनमधून धान्य देतात,परंतू वाटप सुरळीत नियमानुसार होतो की नाही हे कधी पाहतच नाही. सर्व आलबेल सुरू आहे.रेशन दुकानदार निर्ढावलेले आहेत.गरिबाच्या नावावर आलेले धान्य हडपण्याचा एककलमी कार्यक्रम अनेक वर्षापासून कमी-अधिक सुरू आहे.

 

सध्या लॉकडाऊनमुळे अडचणीत पंतप्रधानानी गरिबांना मोफत दिलेला तांदूळही हडप केला जात आहे. हे आंवढीतील घटनेनंतर समोर आले आहे. हा काही आजच असा प्रकार होतो असे नाही,अनेक वर्षापासून तालुक्यातील दुकानदारांकडून अशी सामान्य जनतेची गळचेपी सुरू आहे.शिवाय प्रत्येक गावचे विकण्यात आलेले रेशनचे तांदुळ घेणारा त्याच गावात किंवा जवळपासच्या गावात असतो.

 

शिवाय ग्राहकांपैकी रेशनचा तांदूळ न खाणाऱ्यांची संख्या 50 टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे रेशन दुकानातून तांदूळ घेतात व परस्पर काही ठिकाणी रेशन दुकानदारालाच किंवा एखाद्या एजन्टला 15 रुपये प्रति किलोनी विकले जात असल्याचे आरोप आहेत. हे सर्व बिनबोभाटपणे चालू आहे.यावर पुरवठा विभागाने चिंतन करून आळा कसा घालता येईल याचा विचार करावा.

 

 

गावातील वाटप समित्या तसेच जनतेनी सतर्क होवून गावातील रेशनचा तांदूळ अवैध घेणारा तसेच रेशन दुकानदार कुठे तांदुळ विकतो काय त्याची माहिती संबंधित तहसिल कार्यालय किंवा पोलीस ठाण्याला कळविल्यास काही प्रमाणात प्रतिबंध होवू शकेल.यात गरीब

जनतेनी ज्यांना रेशनच्या तांदळाची गरज नाही.

 

घेतल्याबरोबर अधिक भावाने विकतात तसेच अतिरिक्त भावाने घेणाऱ्यांची तक्रार केल्यास रेशनचा तांदूळ विकणारे तसेच तांदूळ

घेणारे तितकेच जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई झाल्यास गरीब जनता जी रेशनपासून अलिप्त आहे.त्यांना याचा फायदा होईल व कुणीही उपाशी राहणार नाही. यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती संबंधित

विभागाला गुप्तपणे सांगणे गरजेचे आहे.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.