Header Ads

विशेष | आद्य समाज सुधारक : महात्मा बसवेश्वर | डॉ.सौ.सरिता पट्टणशेट्टी यांचा विशेष लेख


 





आपली भारतभूमी खूप महान आहे,प्राचिन काळापासून अनेक ऋषि-मुनि,शरण-संतानी या भूमीवर जन्म घेतला आहे. पंरतू 12 व्या शतकात महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमा प्रांतात जन्मलेले महात्मा बसवेश्वर काहीसे वेगळे ठरतात.फक्त अध्यात्मिक क्षेत्रातच त्यांची कामगिरी फक्त उल्लेखनीय नाही,तर त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले,स्ञीमुक्ती म्हणा,अस्पृश्यता निर्मूलन असूदे,किंवा सामाजिक समता,ह्या सर्व गोष्टी आजच्या काळात सुलभ वाटत आहेत.मात्र 12 व्या शतकात असे विषय अशक्यप्राय होते.समाजामध्ये खूप विषमता होती.मुठभर पुरोहित वर्ग सकल समाजावर अधिपत्य गाजवत होता.सामान्य जनतेची पिळवून केली जात होती.छोट्या-छोट्या गोष्टीसाठी पाप-पुण्याचे दाखले देऊन त्यांचा छळ केला जायचा,यासाठी प्रायचित्य म्हणून सोन्या-चांदीच्या वस्तू मागितल्या जात होत्या.देवा-धर्माच्या नावावर मोठ-मोठे यज्ञ करून त्यात प्राण्याच्या आहुती दिल्या जात होत्या.स्ञियांना तुच्छ समजले जात होते.त्यांना स्वांतत्र नव्हते,शिक्षणांच्या संधी नव्हत्या.फक्त भोग वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते.समाजामध्ये जाती भेद तीव्र होता.उच्च-निच्च अशी भावना होती.ब्राह्मणच श्रेष्ट अन्य जाती नीच कुळातील अशा धारणा बनविण्यात आल्या होत्या.दलितावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला चाक होता.त्या काळात समतानायक,क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वराचा जन्म झाला.स्ञी व शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांची बंधणे तोडून महात्मा बसवेश्वरांनी त्यांना मुक्त केले.दया हेच धर्माचे मूळ आहे,असे सांगून यज्ञात दिली जाणारी प्राण्यांची आहूती बंद केली.अस्पृश्यतेचा पूर्ण

विरोध केला. मनुष्यामधील उच्चनीचता ही त्याने जन्म घेतलेल्या जातीवर किंवा वंशावर अवलंबून नसून ती त्याच्या कर्मावर अवलंबून आहे.असा संदेश लोकांना दिला.

स्वर्ग-नरक अशा भ्रामक कल्पनांमध्ये लोक व्यस्त होते महात्मा बसवेश्वरांनी स्वर्ग-नरक हे वेगळे लोक आहेत असे मानले नाही. ते म्हणतात, 'जे लोक

सदाचाराने वागतात ते(इथेच पृथ्वीवर) स्वर्गात वास करतात आणि जे लोक अनाचाराने वागतात ते नरकात वास करतात. त्यांनी अनुभव मंडप सारखी-संस्था निर्माण केली. जी आजची संसदच म्हणावी लागेल.त्या अनुभव मंडप मध्ये सर्व जातीच्या स्ञी,पुरुषांना प्रवेश होता.तिथे जीवनातील, समाजातील सर्व समस्यांवर चर्चा व्हायची. त्यावर तोडगा शोधला जायाचा.ह्या अनुभव मंडपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्या सदस्यांनी 'कायक' करणे आवश्यक होते.त्यांनी श्रमाला उच्च दर्जा दिला आहे. परमेश्वर प्राप्तीचा मार्ग शुध्द कायकातूनच आहे असे सांगितले.'कायकव्ये कैलास'कुणाला उच्च-निच्च,सर्व समानता,शुध्द मन हीच कुडलसंगम देवाला प्रसन्न करण्याची रीत ठरली आहे.लोकांनी सदाचांराने वागावे हीच खरी भक्ती आहे.अनिष्ट,रूढी-परंपरांचा त्यांनी त्याग केला.समता आधारित समाजाचा पुरस्कार केला.स्वातंत्र्य,समता व बंधुता ह्या लोक शाही तत्वांचा पुरस्कार महात्मा बसवेश्वर यांनी केला.

 

 


डॉ.सौ.सरिता पट्टणशेट्टी

बालरोग तज्ञ,मयुरेश हॉस्पिटल जत


 

 

 

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.