Header Ads

क्राईम न्यूज | बंधाऱ्यात पडून बालकांचा मृत्यू | जत शहरातील घटना 


 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील पारधी तांडा येथे 14 वर्षीय बालकाचा बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला. सनी शंकर कांळे (वय 14,रा.पांरडीताडा,जत)असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.घटना शुक्रवारी सांयकाळी चारच्या दरम्यान घडली.

अधिक माहिती अशी की,कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत शहर चार दिवस लॉक डाऊन करण्यात आले आहे.अशा पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःहून लॉकडाऊन करून घेतले आहेत.जत शहरातील पारधीतांड्या नजिक यल्लम्मा मंदिर ते पाटील मळा या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्याचे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरण करण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे त्या नाल्यात पाणी साठले होते.शुक्रवारी सांयकाळी चारच्या दरम्यान सनी काळे व त्याचा भाऊ व आणखीन एक मित्र खेळत खेळत नाल्याजवळ गेले.खेळता खेळता सनीचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला.सनीच्या भावाच्या हे लक्षात तो सनी पडला आहे,असा आरड्याओरडा करत जवळ असणाऱ्या घरी आला.त्यांच्या आवाजाने घरातील कुंटुबिय व आजूबाजूचे लोक बंधाऱ्याकडे धावले.काही जणांनी बंधाऱ्यात उडी घेऊन सनीला पाण्याबाहेर काढले मात्र तोपर्यत सनीचा मृत्यू झाला होता.घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.दरम्यान बंधाऱ्यांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.यापुर्वी सुमारे 12 चिमुकले,बालकांचा बंधारे,शेततलावात बुडून मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.