Header Ads

उमदी | किराणा दुकानांतील गुळाचा वापर हातभट्टीसाठी | उमदीत पोलीसाचा कारवाईचा इशारा |


उमदी,वार्ताहर : उमदी परिसरात हातभट्टीच्या दारू काढण्यासाठी लागणारा गुळ किराणा दुकानातून विकला जात आहे.त्यामुळे हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात गुळ खरेदी करणाऱ्यांना देऊ नये,अन्यथा किराणा दुकानावर कारवाई करण्यात येईल,असा इशारा सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येक दुकानदारांची जबाबदारी आहे.

असे असताना काहीं किराणा दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात गुळ हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कांही जमातींना दिला जात आहे.  

सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील मद्यपी लोक हातभट्टीकडे वळले आहेत.त्यातच कोरोनाचा प्रभाव असलेल्या कर्नाटक राज्यातील चडचण,देवरनिंबर्गी,हिंचगिरी,निवर्गी आदी भागातील लोक दारू पिण्यास उमदीत येत आहेत.कर्नाटकातील निवर्गी गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे.त्या गावातून उमदी गावात दारू पिण्यासाठी येत आहेत.हे प्रचंड धोकादायक आहे. 

दारू उत्पादन करणारे लोक उमदीतील किराणा दुकानातून गुळ घेत असल्याचे माहिती आहे.त्यामुळे यापुढे असा मोठ्या प्रमाणात गुळ खरेदी करणाऱ्यांना गुळाची विक्री करण्यात येऊ नये,अशा सुचनाही कोळेकर यांनी दिल्या आहेत.

 

गावठी दारूसाठी लागणारे साहित्य तंबाकू, गुटका,बिडी, सिगारेट खरेदी- विक्री करण्यावरही बंदी आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू विकून,नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यावर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

- दत्तात्रय कोळेकर

सा.पो.नि.उमदी पोलीस ठाणे  

Blogger द्वारे प्रायोजित.