Header Ads

| डफळापूर,बिळूर 1मे पासून तीन दिवस लॉकडाऊन |







 

जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोकण्यासाठी जत तालुक्यातील डफळापूर,बिळूर ही गावे आज ता.1 मे ते ता.3 मे पर्यत अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

 

जत तालुक्यातील सीमावर्ती असणारे डफळापूर व बिळूर परिसरात कोरोना विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

लगतच्या सोलापूर,विजापूर,बेळगांव जिल्ह्यात कोरोना विषाणुचे रुग्ण सापडले आहेत.त्या पार्श्वभूमीवर या भागात भविष्यात असा संसर्ग होऊ नये,कोरोनाची साखळी तुटावी यासाठी या उपाय योजना करण्यात येत आहेत.तीन दिवसाच्या बंद काळात दवाखाने,मेडिकल,दुध संकलन केंद्रे,शुध्द पाणी विक्री सुरू राहणार आहे.

 

नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन डफळापूरच्या संरपच बालिकाकाकी चव्हाण व बिंळूरचे संरपच नागनगौडा पाटील यांनी केले आहे.

या बंद काळात नियमाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येतील,असेही सांगण्यात आले.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.