Header Ads

कोरोनाचा ; किंमती वाढल्याने व्यसने सुटण्याच्या मार्गावर










 

उमदी,वार्ताहर : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनावर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच अधिक बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंद केले आहे.

गत एक महिनाभरापासून जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. सुरुवातीचे काही दिवस बरे वाटत असले तरी आता मात्र त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. बाजारात अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.परिणामी या वस्तूंचा काळाबाजार चालू आहे. छापील किमतीपेक्षा चौपट दराने या वस्तूंची विक्री केली जात आहे. या वस्तू  जीवनावश्यक नसल्याने कुणी त्याची तक्रार करत नाही. 10 रुपयात मिळणारी तंबाखूची पुडी 40 रुपयांस, तर ज्यादा विक्री न होणारी 5 ते 8 रुपयाची पुढी 15 ते 20 रुपयांना विकली जात आहे. अधिकृत मद्य  विक्रीची दुकाने सध्या बंद आहेत.यामुळे अनधिकृत मद्य विक्रीला ऊत आला आहे.130 ते 160 रुपयांना मिळणारी विदेशी मद्याची बाटली चक्क 500 ते 550 रुपयांना विकली जात असल्याची चर्चा सुरू आहे.80 ते 100 रुपयांना मिळणारी देशी मद्याची बाटली 300 ते 350 रुपयापर्यंत विकली जात असल्याचे बोलले जात आहे. हाताला काम नाही, पुढे काम मिळेल की नाही याची शास्वती नाही.थकलेला पगार मिळेलच त्याची खात्री नाही. यामुळे हाती असलेला पैसा व्यसनावर खर्च करण्यापेक्षा तो काटकसरीने वापरण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे.अनेक जण गेल्या काही दिवसापासून अशा वस्तूंची खरेदी टाळत आहेत.परिणामी अनेक जण व्यसनापासून दूर जाऊ लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे परिणाम अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषांचे व्यसन सुटत असल्याने घरातील गृहिणींच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत आहे.


 

 



 



 





 




Blogger द्वारे प्रायोजित.