Header Ads

कोरोनाचा रुग्ण नसलातरीही सतर्क रहा ; डॉ.अभिजित राऊत : जतेतील यंत्रणाचा घेतला आढावा









 

जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.अभिजित राऊत यांनी जत तालुक्यातील उपाययोजनाचा आढावा घेतला.वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रास डॉ.राऊत यांनी भेट दिली.प्रांताधिकारी प्रंशात आवटे,बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांच्या दालनात सर्व तयारीचा आढावा घेतला.
जत तालुक्यात सध्या कोरोनाचा रुग्ण नसलातरी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. समाज कल्याणची दोन वसतीगृह व काही शासकीय इमारती ताब्यात घेऊन 812 रुग्णांची सोय होईल,अशी व्यवस्था करण्यात आली आहे.तालुका बाहेरून आलेल्या 12,800 जणांनाची तपासणी करून दक्षता करण्याच्या सुचना दिल्या आहेत.आरोग्य यंत्रणाना त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याशिवाय राजस्थानमधून आलेल्या 67 कामगारांनाही चौदा दिवसासाठी आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली जत येथील मुकबधिर शाळेत ठेवण्यात आले आहे.सर्वांच्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तपासण्या करण्यात आल्या आहेत.त्याशिवाय त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

आरोग्य,महसूल,नगरपरिषद,ग्रामपंचायतीना शासनाचे सर्व सुचना,आदेश दिलेले आहेत.सर्वत्र कोरोना प्रतिबंधित उपाययोजना सुरू असल्याची माहिती बिडिओ धरणगुत्तीकर यांनी डॉ.राऊत यांना दिली.

डॉ.राऊत म्हणाले,तालुक्यात उपाययोजना समाधान कारक आहेत.कोरोना बाधित रुग्ण नसलेतरीही सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे.कोरोना बाधित भागातून येणाऱ्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवावे.शासनाचे सर्व आदेश पाळावेत,अशा सुचना पाळव्यात असे आदेश डॉ.राऊत यांनी दिले.



 





 


 

Blogger द्वारे प्रायोजित.