Header Ads

आवंढीतील शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांना पेरूचे वाटप


आंवढी,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी काम करणारे जत तालुक्यातील तहसिलदार सचिन पाटील व त्यांचे सर्व सहकारी,जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सर्व सहकारी,पंचायत समितीचे बीडीओ अरविंद धरणगुत्तीकर व त्यांचे सर्व सहकारी,आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी  आवंढी गावचे प्रगतशील बागायतदार संभाजी कोडग यांनी स्वतःच्या शेतातील 50 बॉक्स पेरू देऊन एक माणुसकी जपली.तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ धरणगुत्तीकर यांच्याहस्ते या पेरूचे वाटप करण्यात आले.

आवंढी ग्रामपंचायतीच्या वतीने गावचे सरपंच आण्णासाहेब कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर,ग्रामसेवक शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे संभाजी कोडग यांचे आभार मानले.

 

आंवढी ता.जत येथील प्रगतशील शेतकरी संभाजी कोडग यांनी अधिकाऱ्यांसाठी पेरूचे वाटप करण्यात आले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.