Header Ads

कोरोना ; मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहीदांचा दर्जा द्यावा | संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी |






 

आंवढी,वार्ताहर : सध्या सुरू असलेल्या

कोरोना व्हायरस जैविक युद्धात मृत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा,कोरोना संकट काळात पत्रकारांना 'आरोग्य विमा कवच' मिळावा अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महामारीने जगभरामध्ये थैमान घातले आहे.चीन, इटली,अमेरिका, फ्रांस ही प्रगत राष्ट्रे देखील हतबल झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरील हालचाली पाहता हे जैविक महायुद्ध सुरु आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आपल्या भारत देशामध्येही (कोव्हिड 19)कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. देशातील सर्वच राज्यात हा विषाणु आनेक मार्गाने पोहचला आहे, राज्यातील प्रमुख शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

या युद्धात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर व त्यांचे सहकारी लढा देत आहेत. या संवेदशील परिस्थिती मध्ये नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर व हॉस्पीटल चे कर्मचारी सुद्धा मृत झाले आहेत.आरोग्य क्षेत्रातील ज्या व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत या विषाणुशी धैर्याने लढा देत आहेत, त्यांच्या या देशाप्रती प्रामाणिक सेवेची योग्य दाखल घेऊन हि देश सेवा बजावत असताना 'ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना 'शाहिद' घोषित करण्यात यावे व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा.'त्यांच्या कुटुंबाला शहिदांच्या कुटुंबाप्रमाने सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात.

 

देशामध्ये थल सेना, जल सेना, वायू सेना, पोलीस इ. संघटीत कर्मचाऱ्यांचा देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना मृत्यू आल्यास आपण सरकार या नात्याने सर्वोतपरी मदत करता. त्याच प्रमाणे सद्याच्या विदारक परिस्थिती मध्ये प्रतक्ष्य कार्यरत असलेले सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स इ. मृत झाल्यास शहीद घोषित करून त्याच्या परिवाराला  सर्वोतोपरी मदत करावी.

 

आरोग्याची काळजी न घेता 24 तास सेवा काम पत्रकारांना 'आरोग्य विमा कवच' मिळावे,असे निवेदनात म्हटले आहे.




 


Blogger द्वारे प्रायोजित.