Header Ads

सोन्याळ | राजकुमार शिंदे यांच्याकडून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 



सोन्याळ,वार्ताहर ; सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या

संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने गोर गरीब जनतेचे हाल होत असुन मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. सोन्याळ ता जत येथील माजी उपसरपंच राजकुमार शिंदे यांनी स्वखर्चाने आणि पुढाकाराने गोरगरीब जनतेचे हाल व उपासमार होऊ नये यासाठी  पारधी समाज, इंदिरानगर व टीसी जवळील झोपडपट्टी वसाहत परीसरातील रोजंदारीवर काम करणाऱ्या 100 हुन अधिक गोरगरीब कुटुंबाना जीवनावश्यक  वस्तूचे (किराणा सामान) वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरस मुळे संपुर्ण देश चिंतेत आहे,संपुर्ण देशात संचारबंदी लागू केल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर एक वेळेच्या जेवणाची पंचाईत झाली आहे.तर भिक्षेवर जगणाऱ्या लोकांचे जीवन कठीण बनले आहे.या गोरगरीब रोजंदारीवर काम करणे बंद झाल्याने रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे अशा या नागरिकांची बंद काळात योग्य ती सोय व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून माजी उपसरपंच राजकुमार शिंदे यांनी शक्य होईल त्याप्रमाणे मदत केली आहे. यामुळे संचारबंदी काळात गरजूंना चांगली मदत झाली आहे. मदतीनंतर गरजू लाभार्त्यांनी समाधान व्यक्त केले. शासनाने घेतलेल्या

खबरदारीच्या नियमाप्रमाणे व सर्व सुचनांचे पालन करीत जीवनावश्यक असलेला तांदूळ, साखर,तेल, विविध डाळी, मसाले,चटणी, चहापावडर इत्यादी किराणा साहित्याचे किट  वाटप करण्यात आले. यावेळी सोन्याळचे सरपंच सौ संगीता निवर्गी यांचे पती जक्कु निवर्गी,माजी सरपंच माशामा नदाफ, गाव तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार, सोसायटीचे चेअरमन शिवगोंडा निवर्गी, माजी व्हाईस चेअरमन हणमंत शिंदे, लखन होनमोरे, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली, सैफद्दिन नदाफ, सोमनिंग पुजारी, सिद्धाणा संकपाळ, शंकर शिंदे, नितीन शिंदे,राहुल शिंदे, बंडू कांबळे आदी उपस्थित होते.


 

सोन्याळ ता.जत येथील सुमारे 100 हुन अधिक गोरगरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.