Header Ads

कोरोनाला हरविणार आम्ही | जनता कर्फ्यू ; जतकरांचा तिसऱ्यादिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद


जत,प्रतिनिधी : जत शहराचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी बुधवार (ता.22) पासून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. आज तिसऱ्यादिवशी जतकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. काही अति उत्साही तरूण वगळता एकही नागरिक घराबाहेर पडला नाही.रस्ते,चौक,गल्लीबोळेही सुनसान आहेत.बाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहराच्या चारी बाजूनी पोलीसांनी नाकाबंदी केली आहे.शहरात नगरपरिषदेकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरापर्यत पोहचविल्या जात आहेत.नगरपरिषद,पोलीस,महसूलची पथके शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत.आज तिसऱ्या दिवशीही जतकरांनी दिलेल्या प्रतिसाद कोरोनाला हरविणार आम्ही असाच आहे.


अतिउत्साही तरूणांना पोलीसाचा प्रसाद


बाहेर फिरणाऱ्या काही अतिउत्साही नागरिक,तरूणांना पोलीसांनी लाठीचा प्रसाद दिला.तर काही ठिकाणी उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.


Blogger द्वारे प्रायोजित.