Header Ads

बालगाव | ग्रामपंचायततर्फे सॅनिटाईजर,मास्क,प्रोत्साहन भत्ता वाटप

 


 




बालगाव,वार्ताहर : कोरोनाच्या साथीमध्ये खेडोपाडी आरोग्यसेविका आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस घरोघरी जात सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी बालगाव ग्रामपंचायततर्फे सरपंच सौ संगीता बगली,उपसरपंच इरणा सरावाड व ग्राम सेवक किरणकुमार बिरादार यांच्याहस्ते मोफत हँड सॅनिटायजर, मास्क व प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन म्हणून मानधन वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या घातक रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण

आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे. बालगाव ता. जत येथे कर्मचाऱ्यांसोबत ग्रामीण भागात अंगणवाडी व आशा सेविकाही मोलाची कामगिरी बजावत आहेत.उन्हातान्हातून घरोघरी जात आशासेविका सर्वेक्षण

करत आहेत. आशा आणि आरोग्य सेविकांच्या या समाजसेवेच्या कृतज्ञतेपोटी ग्रामपंचायततर्फे मोफत हँड सॅनिटायजर आणि मास्क  वाटप करण्यात आले. यावेळी उप सरपंच इरणा  सारवड यांनी आशा सेविकांना कोरोना साथीत काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयीही सूचना केल्या. अगदी तुटपुंज्या मानधनावर या आशासेविका काम करत आहेत. कोरोना साथीत आशा सेविकांना काम केलेल्या कालावधीत त्यांना शासनाने प्रत्येकी पाच हजार प्रोत्साहन भत्ता द्यावी,अशी मागणीही सारवड यांनी केली.आपल्या कामाची दखल समाजातून घेतली जात असल्याबद्दल अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी इरणा सारवड (उपसरपंच) ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कांबळे,ग्रामपंचायत सदस्य अंबण्णा माळी ,लक्ष्मण गुद्दोडगी,गणेश माने,रवी कांबळे, उमेश कळी, मल्लू तेलसंग , प्रकाश  तेलसंग, मादू तेलसंग याच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होत्या.

 

ग्रामपंचायत बालगावतर्फे सरपंच व उपसरपंच यांच्याहस्ते मोफत सॅनिटाईजर,मास्क व आशा वर्कर्सना प्रोत्साहन भत्ता वाटण्यात आले. 

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.