Header Ads

संख | ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,कर्मचाऱ्यांना अनुदानाचे वाटप


 

 

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सर्वाधिक धोका पत्करून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,कर्मचाऱ्यांना मास्क,व प्रत्येकी एक हजार रूपयाचे वाटप करण्यात आले.

सरपंच सौ.मंगलताई पाटील व  ग्रामविकास अधिकारी के.डी.नरळे यांच्या हस्ते संख येथील एकूण 11आशा वर्कर,गट प्रर्वतक 2 व 5 अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी एक हजार व मास्क देण्यात आले,मास्क प्रत्येक वाड्यावस्त्यावर गरजू व गरीब शेतकरी लोकांना मास्क वाटप करा व कोरोना पासून मुक्त राहण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मास्क देण्यात आले आहे. सर्व सेवा सोसायटी ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस ओटपोस्ट महावितरण तहसीलदार ऑफिस अशा ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी उपसरपंच सदाशिव दर्गाकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

संख ग्रामपंचायतीकडून कोरोना विशेष अनुदानाचे चेक वाटप करताना संरपच मंगल पाटील,कुशाबा नरळे
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.