Header Ads

जत | एनपीएच लाभार्थ्यासाठी मे व जून करीता कमी दरात धान्य लाभ ; तहसिलदार सचिन पाटील

 

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात ज्यां केसरी कार्डधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत नाहीत,अशा कार्डधारकांना माहे मे व माहे जुन 2020 करीता प्रती मानसी 3 किलो गहू दर रु.8/- तर प्रती मानसी 2 किलो तांदुळे दर रु.12/- या स्वस्त दराने गहू व तांदुळ वितरीत केला जाणार आहे,अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने

संचारबंदीच्या काळात जिवनावश्यक सेवाचा भाग म्हणून शासनाकडील नियमीत स्वस्त दरातील व मोफत स्वरुपातील धान्य योजनेचा पुरवठा व लाभ तालुकेतील सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानदारांकडून लाभार्थी यांना बिनचूक प्रमाण व दरानुसार देणेच्या सुचना आहेत.त्यानुसार तालुकेतील

अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थ्याना नियमीत दरातील धान्य एप्रिल 2020 करीताचे वितरण करणेत आले

आहे.शिवाय अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2020

अंतर्गत माहे एप्रिल,मे,जून करीता मोफत तांदुळ प्रती मानसी 5 किलो शासन आदेशानुसार वितरण करणेत

येत आहे.सदर योजनेचा लाभ जत तालुक्यातील 177 दुकानदारां मार्फत वितरीत केला जात असून योजनेचा

मुख्य हेतु हा की, जे लाभार्थी अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील आहेत त्यांनाच नियमीत योजनेच्या लाभासह पंतप्रधान गरीब कल्यान योजना 2020 अंतर्गत माहे एप्रिल,मे,जून करीता मोफत तांदुळ प्रती मानसी 5 किलो शासन आदेशाने वितरीत करणेत येणार आहे. सदर योजनेचे तालुक्यातील एकूण ऑनलाईन लाभार्थी (पॉस मशिन वर नोदं असलेले) प्राधान्य गट (अन्नसुरक्षा योजना) कार्डधारक 47,055 असून त्यातील कार्ड सदस्य संख्या 2,22,877 इतकी ऑनलाईन नोंद आहे. तर अंत्योदय योजना ऑनलाईन कार्डधारक (पॉस मशिन वर नोदं असलेले) 2940 असून त्यातील सदस्य संख्या 13,800 इतकी आहे यांना प्रती सदस्य 5 किलो तांदूळ मोफत वितरण करणेत येत आहे.या व्यतिरिक्त जे कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसलेले निव्वळ केसरी कार्डधारक(एनपीएच) आहेत.

ज्यांना माहे मे व माहे जुन 2020 करीता प्रती मानसी 3 किलो गहू दर रु.8/- तर प्रती मानसी 2 किलो तांदुळे दर रु.12/- या स्वस्त दराने गहू व तांदुळ वितरीत केला जाणार आहे. तरी सदरचे स्वस्त दराचे धान्य इतर केसरी कार्डधारक (एनपीएच) यांना माहे मे व जून 2020 मध्ये वितरीत केले जाणार असलेने, सध्या वितरीत केले जात असलेले मोफत तांदूळ हे केवळ नियमीत योजनापात्र लाभार्थी असलेल्या (ऑनलाईन इपॉस मशिन नोंद असलेल्या) लाभधारकांनाच मिळणार आहे. त्यामुळे सरसकट केसरी कार्ड धारकांना मोफत धान्य बाबत गैरसमज करुन कुणीही सोशल मिडीयातील संदेश व अफवांवर विश्वास ठेवू नये व त्याबाबत रास्त भाव धान्य दुकानदार किंवा तहसिल कार्यालयमध्ये गर्दी करुन सोशल डिस्टन्सींग या नियमांचा भंग करु नये असे अवाहन जत तहसिलदार श्री सचिन पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे केले आहे.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.